भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज खेळला जात आहे. तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर विराट कोहलीने डाव सांभाळला आणि अर्धशतक झळकावले. या डावात 63वी धावा करताच कोहली वनडे इतिहासात सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे.
या सामन्यापूर्वी विराट कोहली वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत 12588 धावांसह सहाव्या क्रमांकावर होता तर महेला जयवर्धने 12650 धावांसह पाचव्या क्रमांकावर होता. या सामन्यात 63 धावा करताच विराटने त्याला मागे सोडले आणि सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे.
𝘿. 𝙀. 𝙇. 𝙄. 𝙎. 𝙃! ☺️
Those were some delightful hits from @imVkohli 👏 👏
Watch 🎥👇https://t.co/7HtZDSc1uJ #TeamIndia | #INDvSL
— BCCI (@BCCI) January 15, 2023
सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर आहे
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकरचे नाव आघाडीवर आहे. सचिनने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 463 सामन्यांच्या 452 डावांमध्ये 18426 धावा केल्या होत्या. यामध्ये 49 शतके आणि 96 अर्धशतके आहेत.
सचिनचा विक्रम आजपर्यंत कोणताही फलंदाज मोडू शकलेला नाही. दुसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा आहे. ज्याने 404 सामन्यांच्या 380 डावात 14234 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगने 375 सामन्यात 13704 धावा केल्या आहेत. त्यापाठोपाठ श्रीलंकेचा दिग्गज सनथ जयसूर्याचे नाव आहे. चौथ्या स्थानावर असलेल्या जयसूर्याने 445 सामन्यांत 13430 धावा केल्या होत्या.
ODI मध्ये सर्वाधिक धावा: सर्वाधिक धावा करणारे 5 खेळाडू
1. सचिन तेंडुलकर – 18426 धावा
2. कुमार संगकारा – 14234 धावा
3. रिकी पाँटिंग – 13704 धावा
4. सनथ जयसूर्या – 13430 धावा
5. विराट कोहली – 12651 धावा
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, कुसल मेंडिस (डब्ल्यू), अशेन बंदारा, चरिथ अस्लंका, दासुन शानाका (क), वानिंदू हसरंगा, जेफ्री वांडरसे, चमिका करुणारत्ने, कसून राजिथा, लाहिरू कुमारा
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (क), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (वा.), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज