Virat-Anushka: विराट कोहली दुसऱ्यांदा झाला बाप, पत्नी अनुष्काने मुलाला दिला जन्म

WhatsApp Group

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली दुसऱ्यांदा बाप झाला आहे. विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला आहे. विराट आणि अनुष्का त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी गेल्या महिन्यापासून लंडनमध्ये होते. विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना वडील झाल्याची खुशखबर दिली.

15 फेब्रुवारीला अनुष्काने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मात्र याबाबत पाच दिवसांनी त्यांनी जाहीरपणे याबाबत माहिती दिली. विराट कोहली आता सुरू असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेमध्ये न खेळण्याचं खरं कारण आता समोर आलं आहे. विराट कोहली आणि अनुष्का यांनी वामिका नावाची मुलगी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

दरम्यान, जानेवारी 2021 मध्ये तिने मुलगी वामिकाला जन्म दिला. लग्नानंतर अनुष्का चित्रपटांपासून दूर आहे. 2018 मध्ये झिरो हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटामध्ये दिसली नाही. वामिकाचा चेहरा त्यांंनी सर्वांपासून लपवून ठेवला होता. मात्र एका सामन्यामध्ये कॅमेरामध्ये कॅच झाल्यावर कोहलीच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी अनुष्का आणि विराटने फोटो व्हायरल करू नका अशी विनंती केली होती. यावेळी मात्र त्यांनी गुप्तता ठेवलेली पाहायला मिळाली.