Virat Kohli 200 Million Followers: इंस्टाग्रामचा ‘किंग’ कोहलीच! विराटची इंस्टाग्रामवर डबल सेंचुरी

WhatsApp Group

Virat Kohli 200 Million Followers: भारतीय संघाचा महान फलंदाज विराट कोहलीने क्रिकेटच्या मैदानावर अनेक कारनामे केले आहेत. फलंदाजीमध्ये असे फार कमी विक्रम आहेत ज्यावर विराटचे राज्य नाही. पण विराटने जेवढे आपल्या बॅटने केले आहे तेवढेच तो सोशल मीडियावरही करत असतो. दरम्यान, विराटने इंस्टाग्रामवर एक नवा विक्रम केला आहे.

बॅटने मोठे विक्रम करणाऱ्या विराटने इंस्टाग्रामवर एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंस्टाग्रामवर 200 मिलियन फॉलोअर्स असलेला विराट पहिला भारतीय ठरला आहे. या प्रकरणी विराटच्या जवळ एकही भारतीय नाही. एवढेच नाही तर गेल्या वर्षी 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारा विराट पहिला भारतीय ठरला होता. विराटने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

सर्वाधिक फॉलोअर्स असलेले क्रीडा दिग्गज

  • क्रिस्टियानो रोनाल्डो – 451 मिलियन
  • लिओनेल मेस्सी – 334 मिलियन
  • विराट कोहली – 200 मिलियन
  • नेमन जूनियर – 175 मिलियन
  • लेब्रॉन जेम्स – 123 मिलियन