Viral Video: “नोरा फतेही तुमची कोण लागते?” लग्नमंडपात भटजींनी विचारला अजब सवाल; नवरदेवाची उत्तर ऐकून नवरीची हसायला लागली
लग्नसमारंभ म्हटले की मंगलमय मंत्र, नातेवाईकांची घाई आणि गांभीर्य डोळ्यासमोर येते. पण सध्याच्या काळात काही लग्नांमध्ये असे काही मजेशीर प्रसंग घडतात की ते आयुष्यभरासाठी आठवणीत राहतात. सोशल मीडियावर सध्या अशाच एका ‘कूल’ भटजींचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या भटजींनी चक्क लग्नाच्या विधींदरम्यान बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीचे नाव काढले, ज्यानंतर लग्नमंडपात हास्याचे कारंजे उडाले.
भटजींचा हटके प्रश्न आणि नवरदेवाचे उत्तर
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, लग्नाचे विधी सुरू असताना भटजी अचानक नवरदेवाला एक भलताच प्रश्न विचारतात. भटजी विचारतात, “या हिशोबाने नोरा फतेही तुमची कोण लागली?” हा प्रश्न ऐकताच नवरदेव-नवरीसह उपस्थित पाहुणेही चक्रावून गेले. नवरदेवाने क्षणभर विचार केला आणि हसत विचारले, “बहीण आहे का?” यावर भटजींनी अत्यंत मिश्किलपणे उत्तर दिले, “आई… ती तुमच्यापेक्षा खूप मोठी आहे. कुठेही दिसली तर पाया पडून नमस्कार करा आणि माझा ‘हॅलो’ सांगा!” भटजींची ही हजरजबाबी वृत्ती पाहून लग्नमंडपात एकच हशा पिकला.
७० लाखांहून अधिक व्ह्यूज!
हा मजेशीर व्हिडिओ इंस्टाग्रामवर ‘snapmyshaadi.co’ नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. अवघ्या काही दिवसांत या व्हिडिओला ७० लाखांहून अधिक (७ मिलियन) व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला पसंती दिली आहे. लग्नातील गंभीर वातावरणात आपल्या विनोदी शैलीने सर्वांना हसवणाऱ्या या भटजींचे नेटकरी भरभरून कौतुक करत आहेत.
नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिले, “पंडितजी तर नोरा फतेहीचे मोठे फॅन दिसतात!” तर दुसऱ्याने गंमतीत म्हटले, “असं वाटतंय की पंडितजींना नोरावर क्रश आहे.” काही युजर्सनी तर “माझ्या लग्नातही हेच पंडितजी हवेत,” अशी इच्छा व्यक्त केली आहे. एका महिला युजरने कमेंट केली की, “ओव्हरटाईम करेन पण लग्नात अशाच हसऱ्या पंडितजींना बोलवेन.” एकूणच या व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर सध्या चांगलीच धम्माल उडवून दिली आहे.
