Viral Video: ‘फेव्हरेट ॲनिमल कोणता?’ विदेशी महिलेच्या प्रश्नावर रिक्षाचालकाचे भन्नाट उत्तर, पाहा व्हायरल व्हिडिओ
सोशल मीडिया हे अशा ठिकाण आहे जिथे कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्या इंटरनेटवर एका रिक्षाचालकाचा आणि परदेशी महिला पर्यटकाचा व्हिडिओ प्रचंड धुमाकूळ घालत आहे. एका साध्या संवादातून असा काही विनोद निर्माण झाला की, हा व्हिडिओ पाहणारे नेटकरी आपली हसू आवरू शकत नाहीत. हा मजेशीर किस्सा श्रीलंका येथील एका रिक्षा प्रवासादरम्यान घडला आहे.
एक विदेशी ट्रॅव्हल व्लॉगर श्रीलंका पर्यटनावर असताना रिक्षामधून प्रवास करत होती. प्रवास रंजक करण्यासाठी तिने चालकाशी गप्पा मारण्यास सुरुवात केली आणि एक साधा प्रश्न विचारला, “तुमचा आवडता प्राणी कोणता?” (Which is your favorite animal?). रिक्षाचालकाने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले, “चिकन!” हे उत्तर ऐकताच ती महिला चक्रावून गेली. तिला वाटले कदाचित चालकाला प्रश्न समजला नसावा, म्हणून तिने हसत पुन्हा विचारले, “चिकन का? काय खाण्यासाठी?” यावर चालकाने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
View this post on Instagram
चूक उमजताच मारली कोलांटी उडी
काही वेळ आपल्या उत्तरावर ठाम राहिल्यानंतर, रिक्षाचालकाला आपण प्राणी विचारल्यावर खाण्याच्या पदार्थाचे नाव घेतले असल्याची जाणीव झाली. त्याने लगेच आपली चूक सुधारत पासा पलटवला आणि म्हणाला, “नाही, नाही… मला कुत्रा आवडतो! माझ्याकडे जर्मन शेफर्ड आहे.” यावर त्या विदेशी महिलेने त्याची फिरकी घेत विचारले, “पण तू कुत्रा तर खात नाहीस ना?” त्यावर चालकाने हसत हसत स्पष्टीकरण दिले की, तो कुत्रा खात नाही. या मजेशीर संवादामुळे रिक्षामध्ये हास्याचे कारंजे उडाले.
२ कोटींहून अधिक व्ह्यूज; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @likeabirdieनावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत त्याला २.३ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरी यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, “अरे भावा, चिकन प्राण्यांच्या यादीत कधीपासून आले? ते तर मेनु कार्डचा भाग आहे.” दुसऱ्याने याला ‘मोय-मोय’ मोमेंट म्हटले आहे, तर तिसऱ्याने “हसून हसून पोटात दुखायला लागले,” अशी कमेंट केली आहे. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र शेअर केला जात आहे.
