चिमुकलीचा हा Video पाहून नक्कीच तुमच्या अंगावर काटा येईल, पहा व्हिडिओ

WhatsApp Group

एका चिमुकलीचा जवानाला नतमस्तक होतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये ही चिमुकली जवानांजवळ जावून जवानाच्या पाया पडते. या चिमुकलीचं सोशल मिडीयावर जोरदार कौतुक होत आहे.

तसेच मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) खासदार पी सी मोहन (MP P C Mohan) यांनी या चिमुकलीचा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर (Twitter) शेअर केला असुन आपल्या पाल्यांला देशभक्तीची शिकवण देणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे असं कॅप्शन (Caption) त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

मेट्रो स्थानकामध्ये प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या काही लष्करी गणवेशातील सैनिकांजवळ एक चिमुकली चालत जाताना या व्हिडीओमध्ये दिसते. या सैनिकांच्या जवळ गेल्यानंतर तेथील सैनिकांपैकी एकजण तिच्या गालाला हात लावून तिचं कौतुक करतो. त्यानंतर ही चिमुकली थेट या सैनिकाच्या पाया पडते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं वायरल होतं आहे.