Viral Video: हिमाचलमध्ये पर्यटकांचा अश्लील अवतार! बर्फात उघड्या अंगाने नाचत रस्ता रोखला; संतापलेल्या नेटकऱ्यांनी ‘ओल्ड मॉन्क’वरून मारले टोमणे

WhatsApp Group

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हिमाचल प्रदेशात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. मात्र, या गर्दीत काही ‘हुल्लडबाज’ पर्यटकांनी सभ्यतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पर्यटकांचा एक गट बर्फाच्छादित रस्त्याच्या मध्यभागी चक्क शर्ट काढून (अर्धनग्न अवस्थेत) नाचताना दिसत आहे. त्यांच्या या कृत्यामुळे लांबच लांब ट्रॅफिक जॅम झाले असून, इतर पर्यटक आणि स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नेमकी घटना काय?

‘X’ (ट्विटर) वर @GemsHimachal या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, बर्फाने माखलेल्या रस्त्यावर काही तरुण मोठ्या आवाजात संगीत लावून नाचत आहेत. धक्कादायक म्हणजे, कडाक्याच्या थंडीतही त्यांनी अंगातील कपडे काढले असून त्यांच्या हातात मद्याच्या बाटल्यांसारखी काहीतरी वस्तू दिसत आहे. आजूबाजूला वाहने हॉर्न वाजवत असतानाही हे तरुण रस्ता सोडायला तयार नाहीत. या प्रकारामुळे रस्त्यावर कुटुंबासह आलेल्या इतर पर्यटकांना मान खाली घालावी लागली.

नेटकऱ्यांचा संताप आणि टोमणे

हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्स चांगलेच भडकले आहेत. अनेकांनी याला ‘अश्लील’ कृत्य म्हणत हिमाचल सरकार आणि पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

  • हार्ट अटॅक आणि वॅक्सीन: एका युजरने उपरोधिकपणे म्हटले की, “असे लोक बर्फात उघड्या अंगाने नाचतील आणि उद्या जर हार्ट अटॅक आला, तर लोक व्हॅक्सीनला दोष देतील.”

  • ओल्ड मॉन्कची जाहिरात: एका युजरने टोमणा मारत म्हटले, “कदाचित हे लोक ‘ओल्ड मॉन्क’ (मद्य) ची जाहिरात करत असावेत.”

  • जेलमध्ये टाका: एकाने मागणी केली की, अशा लोकांचे वाहन जप्त करून त्यांना थेट तुरुंगात पाठवावे, जेणेकरून ‘देवभूमी’चे पावित्र्य जपले जाईल.

स्थानिक कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

अनेकांनी या घटनेवरून हिमाचल सरकारवर टीका केली आहे. “हिमाचल हे पर्यटनासाठी आणि देवांची भूमी म्हणून ओळखले जाते, पण सरकार अशा गुंडांवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत आहे,” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. डलहौजीसारख्या ठिकाणी यापूर्वी अशाच हुल्लडबाजीमुळे अपघात होऊन एका कुटुंबाला प्राण गमवावे लागल्याची आठवणही एका युजरने करून दिली.