थरार समद्राखालचा! अंडरवॉटर फोटोशूट करताना मागे आली महाकाय ‘व्हेल शार्क’; मृत्यू समोर असताना तरुणीने जे केलं…

WhatsApp Group

समुद्राच्या अथांग निळ्या पाण्यात फोटोशूट करणे अनेकांसाठी एक स्वप्न असते, पण फिलीपीन्समध्ये मौरिन कैलागो नावाच्या तरुणीसाठी हे स्वप्न एका क्षणात भयानक स्वप्नात बदलणार होते. मौरिन जेव्हा समुद्राच्या तळाशी फोटोशूटमध्ये मग्न होती, तेव्हा जगातील सर्वात मोठा मासा मानला जाणारा ‘व्हेल शार्क’ अचानक तिच्या मागे येऊन उभा राहिला. हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फोटोसाठी पोझ दिली आणि…

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, मौरिन पाण्याचा आत अतिशय शांतपणे कॅमेऱ्यासमोर पोझ देत आहे. ती आपल्याच धुंदीत असताना एक विशाल व्हेल शार्क हळूच तिच्या मागे येतो. मौरिनला याची पुसटशी कल्पनाही नसते. तो महाकाय मासा इतका जवळ येतो की, त्याच्या शरीराचा एक हलका धक्का मौरिनच्या हाताला लागतो. जेव्हा तिला जाणीव होते की आपल्या मागे मृत्यू उभा आहे, तेव्हा तिथलं वातावरण अतिशय गंभीर होतं.

घाबरली नाही, तर दाखवलं धाडस

सामान्यतः एवढा मोठा मासा जवळ आल्यावर कुणाचीही बोबडी वळली असती किंवा घाबरून हातपाय मारल्यामुळे शार्क अधिक आक्रमक झाला असता. मात्र, मौरिनने दाखवलेल्या प्रसंगावधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने अजिबात गोंधळ न घालता किंवा न घाबरता अत्यंत सावध हालचाली केल्या. तिने माशाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने हळूच वरच्या बाजूला पोहण्यास सुरुवात केली. तिच्या या शांत स्वभावामुळेच ती सुरक्षितपणे बाहेर येऊ शकली.

नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे रोंगटे उभे राहिले आहेत. “जर मी तिथे असतो तर घाबरूनच जीव गेला असता,” अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर अनेकांनी मौरिनच्या संयमाचे कौतुक केले आहे. समुद्रातील वन्यजीवांशी वागताना कशा प्रकारे शांत राहावे लागते, याचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.