Viral Video: बिबट्याच्या जबड्यातून ओढून आणला आपला मित्र! ‘डोगेश भावांची’ एकजूट पाहून शिकारीही झाला अवाक

WhatsApp Group

सोशल मीडियावर सध्या एका अशा व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे, जो पाहून तुम्हालाही जाणीव होईल की, ‘एकटा असेल तर शिकार, पण झुंड असेल तर सरकार!’ राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील जवाई लेपर्ड सफारी (Jawai Jungle Leopard Safari) मधून समोर आलेल्या एका हाय-व्होल्टेज ड्राम्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका बिबट्याला आव्हान देणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या टोळीने आपली मैत्री आणि हिंमत काय असते, याचे जिवंत उदाहरण जगासमोर ठेवले आहे.

बिबट्याचा हल्ला आणि कुत्र्यांची जिद्द

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, तीन कुत्रे एका खडकावर उभे राहून समोर असलेल्या बिबट्याला ललकारत आहेत. बिबट्याला वाटले की हे कुत्रे म्हणजे त्याचे आजचे सोपे शिकार आहेत. क्षणाचाही विलंब न लावता, बिबट्याने विजेच्या वेगाने त्यांच्यावर झडप घातली आणि एका कुत्र्याला जबड्यात दबोचले. बिबट्याचा हल्ला इतका भयानक होता की, सुरुवातीला इतर दोन कुत्रे घाबरून मागे पळाले. हे दृश्य पाहून कोणालाही वाटले असते की, आता त्या कुत्र्याचा जीव जाणे अटळ आहे.

 

जेव्हा ‘जय-वीरू’सारखे धावून आले मित्र

आपल्या मित्राला बिबट्या ओढून नेत असल्याचे पाहताच, पळून गेलेले दोन कुत्रे ‘जय-वीरू’सारखे परतले. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता बिबट्यावर चहुबाजूंनी हल्ला चढवला. ‘डोगेश भावांचा’ हा अनपेक्षित पलटवार पाहून खुद्द शिकारी बिबट्याही चक्रावून गेला. कुत्र्यांचा आक्रमक पवित्रा आणि एकजूट पाहून बिबट्याला हार मानावी लागली. अखेर, तो कुत्र्याला सोडून झुडपांच्या दिशेने पळून गेला. आपल्या सहकाऱ्याचा जीव वाचवून कुत्र्यांनी सिद्ध केले की, प्राण्यांमध्येही मैत्री आणि एकजूट किती प्रबळ असते.

इंटरनेटवर ‘कालू भाई’चा जलवा!

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @jawai_leopard_safari_bookings या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत १५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये तर कुत्र्यांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. एका युजरने लिहिले, “मैत्री म्हणजे काय असते हे कालू भाईकडून शिका!” तर दुसऱ्याने मजेशीरपणे म्हटले, “डोगेश भावांचा भौकाल आहे राव!” या व्हिडिओमुळे आता सोशल मीडियावर प्राण्यांच्या शौर्याच्या चर्चा रंगल्या आहेत.