Viral Video: भिकाऱ्याचा ‘स्वॅग’च न्यारा! भीक मागण्यासाठी वापरली अशी शक्कल की तुम्हीही माराल कपाळावर हात; व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group

सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात ‘क्रिएटिव्हिटी’ किंवा कल्पकता महत्त्वाची ठरत आहे. पण ही कल्पकता जेव्हा भीक मागण्यासारख्या कामात वापरली जाते, तेव्हा काय होतं याचा नमुना सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीने भीक मागण्यासाठी अशी काही भन्नाट पद्धत शोधून काढली आहे की, ती पाहून लोक थक्कही झाले आहेत आणि हसून हसून लोटपोटही झाले आहेत. या पठ्ठ्याची ही अजब ‘कलाकारी’ पाहून तुम्हीही म्हणाल, “टॅलेंट तर भारी आहे!”

‘भीक’ नाही तर पूर्ण ‘एंटरटेनमेंट’!

सामान्यतः आपण पाहतो की, रस्त्यावर भीक मागणारी माणसे आपली हतबलता किंवा शारीरिक व्याधी दाखवून लोकांकडे पैसे मागतात. पण या व्हायरल व्हिडिओमधील व्यक्तीने मात्र वेगळाच मार्ग निवडला. व्हिडिओमध्ये एका वर्दळीच्या बाजारपेठेचे दृश्य दिसते. तिथे एक मध्यम उंचीची, धट्टीकट्टी व्यक्ती येते. आजूबाजूचे लोक आपापल्या कामात व्यस्त आहेत. इतक्यात ही व्यक्ती मध्यभागी बसते, आपला शर्ट काढून जमिनीवर ठेवते आणि अचानक विचित्र पद्धतीने हात-पाय वाकडे करून जमिनीवर झोपते. हे दृश्य पाहून कोणालाही वाटेल की ही व्यक्ती शारीरिकदृष्ट्या अपंग आहे. मात्र, ज्यांनी त्याची ही ‘एंट्री’ पाहिली नाही, ते लोक त्याला पैसे देऊन निघून जातात.

८ लाखांहून अधिक लोकांनी पाहिली ही ‘नौटंकी’

हा मजेशीर व्हिडिओ ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर @Wellutwt नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. अवघ्या एक मिनिटाच्या या व्हिडिओला आतापर्यंत ८ लाख ३४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ८ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला पसंती दिली असून कमेंट्सचा पाऊस पडला आहे. आपली शारीरिक स्थिती ‘मॅनिपुलेट’ करून पैसे कमावण्याच्या या अजब कलेने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी या भिकाऱ्याला चक्क ‘कलाकार’ (Artist) अशी पदवी दिली आहे. एका युजरने गमतीने लिहिले, “हा भीक मागत नाहीये, तर लोकांचे पूर्ण मनोरंजन करत आहे.” दुसऱ्या एका युजरने भारतीय कल्पकतेचे कौतुक करताना म्हटले, “भारतीय लोक खरोखरच सर्वात जास्त क्रिएटिव्ह आहेत.” तर काहींनी याला ‘टॅलेंट’ म्हणत, “कामाची पद्धत कोणतीही असो, त्यात वेगळेपण महत्त्वाचे,” अशी मिश्किल टिप्पणी केली आहे. मात्र, ही ‘नौटंकी’ पाहून अनेकांनी कपाळावर हात मारून घेतला आहे.