भारतीय रेल्वे आणि रॅपिड रेल (RRTS) नेटवर्कमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिल्ली ते मेरठ दरम्यान धावणाऱ्या ‘नमो भारत’ एक्स्प्रेसमध्ये एका तरुण-तरुणीने अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज लीक झाल्यामुळे रेल्वे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
चालत्या ट्रेनमध्ये लज्जास्पद प्रकार
व्हायरल झालेल्या ४ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये तरुण आणि तरुणी अत्यंत आक्षेपार्ह स्थितीत दिसून येत आहेत. दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सामाजिक शिस्तीचा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
View this post on Instagram
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारचे गैरप्रकार आढळल्यास त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. तसेच, व्हायरल व्हिडिओ शेअर करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे, कारण यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात.
