Viral Video: ‘आई ती आईच असते!’ श्वानाला लहान मुलासारखं मांडीवर घेऊन भरवले वरण-भात; महिलेच्या मायेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

WhatsApp Group

सोशल मीडियावर प्राणी आणि मानवाच्या प्रेमाचे अनेक किस्से आपण रोज ऐकतो. मात्र, सध्या एका ‘डॉग लव्हर’ महिलेचा असा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. एका आईने आपल्या लहान बाळाची जशी काळजी घ्यावी, अगदी तशाच मायेने ही महिला आपल्या पाळीव श्वानाला (Pet Dog) मांडीवर निजवून जेवण भरवताना दिसत आहे. या व्हिडिओने इंटरनेटवर नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

‘डोगेश भाई नाही, छोटा मुलगा म्हणा!’

इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या अवघ्या २६ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये मायेचे एक सुंदर रूप पाहायला मिळते. एक महिला जमिनीवर बसली असून तिचा पाळीव श्वान एखाद्या लहान बाळाप्रमाणे तिच्या मांडीवर पाठीवर झोपला आहे. ही महिला अतिशय प्रेमाने वरण-भाताचे लहान-लहान घास कालवून त्याला आपल्या हाताने भरवत आहे. विशेष म्हणजे, श्वानाचे केस खराब होऊ नयेत म्हणून तिने त्याच्या छातीवर एक कापडही ठेवले आहे. जेवण झाल्यावर ही महिला त्याला प्रेमाने कुरवाळते आणि त्याच्याशी गप्पाही मारते. व्हिडिओवर ‘डोगेश भाई नाही, छोटा मुलगा म्हणा’ असा मजकूर लिहिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Eastnagpurnews (@eastnagpurnews_)

८ लाखांहून अधिक व्ह्यूज

हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या जगात वणव्यासारखा पसरला असून त्याला आतापर्यंत ८ लाख ७५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. १ लाख २० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले असून ही संख्या झपाट्याने वाढत आहे. प्राण्यांविषयीचा असा निस्सीम जिव्हाळा पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

कमेंट सेक्शनमध्ये युजर्स या ‘क्युट बॉन्डिंग’चे भरभरून कौतुक करत आहेत. एका युजरने म्हटले की, “आई शेवटी आईच असते, मग तिचं बाळ कोणतंही असो.” दुसऱ्या एका युजरने गमतीने लिहिले, “याच आया सुरुवातीला म्हणतात की घरात कोणताही कुत्रा-बित्रा येणार नाही, आणि नंतर तोच त्यांचा लाडका मुलगा बनतो.” तर एकाने आपल्या बालपणीची आठवण काढत म्हटले की, “आम्ही जेव्हा जेवताना रडायचो, तेव्हा आम्हालाही असंच पकडून भरवलं जायचं.