शेंगदाणे विकणारा ‘कच्चा बदाम’ गाण्याचा गायक भुबन बड्याकरची संपूर्ण कहाणी

WhatsApp Group

‘कच्चा बदाम’ Kacha Badam हे गाणे सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असून हे गाणं धुमाकूळ घालत आहे. यावर सर्वजण रील्स बनवत आहेत. आत्तापर्यंत या गाण्यावर जवळपास 3.5 लाख रील्स बनवल्या गेल्या आहेत.

प्रश्न असा आहे की हे गाणं कुठून आलं? कोणत्या चित्रपटातील आहे आणि कोणी गायलं आहे? तर माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की हे गाणे पश्चिम बंगालमधील आहे परंतु ते कोणत्याही चित्रपटातील नाही किंवा ते कोणत्याही मोठ्या गायकाने गायले नाहीय. हे गाण एका शेंगदाणा विक्रेत्याने गायलं आहे. या गाण्याचे बोल बंगाली भाषेत आहेत.

माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे गाणे भुबन बड्याकरने Kacha Badam singer Bhuban Badyakar गायले आहे. तो मूळचा पश्चिम बंगालमधील कुरलजुरी गावचा आहे. त्याच्या वडिलांना तीन भाऊ आहेत. आणि पोट भरण्यासाठी ते शेंगदाणे विकण्याचे काम करतो.

सायकलवर शेंगदाण्यांनी भरलेली पिशवी लटकवून तो घरातून निघतो आणि ‘कच्छा बदाम’ गाणे म्हणत गावोगावी जातो. तेथे ते घरातील तुटलेल्या वस्तूंच्या बदल्यात शेंगदाणे विकतो. भुबन याचे रोज 200-250 रुपयेच मिळतात. दिवसाला 200 ते 250 रुपये मिळवणाऱ्या भुबन बडईकर यांचं ‘कच्चा बदाम’ हे गाण सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत असून यातून त्यांची परिस्थीती सुधारेल अशी अपेक्षा आहे.