Viral Post: आजारपणामुळे सुट्टी मागितली अन् बॉसने मागितलं ‘लाईव्ह लोकेशन’; रेडिटवर चॅट व्हायरल, युजर्सनी सुचवले मॅनेजरची ‘नानी’ आठवणारे उपाय!
कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या गोपनीयतेचा (Privacy) प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. रेडिटवर @Capital_Option_7780 नावाच्या युजरने त्याच्या बॉससोबत झालेल्या व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने विचारले आहे की, “आजारपणाच्या सुट्टीसाठी लाईव्ह लोकेशन मागणे योग्य आहे का?” या पोस्टवर युजर्सनी बॉसला धडा शिकवण्यासाठी एकापेक्षा एक भारी सल्ले दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
संबंधित कर्मचाऱ्याला तीव्र डोकेदुखीमुळे सुट्टी हवी होती. जेव्हा त्याने आपल्या बॉसला मेसेज केला, तेव्हा बॉसने त्याला एचआर (HR) विभागाशी बोलायला सांगितले. एचआरने आजारपणाचा पुरावा म्हणून ‘व्हॅलिड डॉक्युमेंट्स’ मागितली. जेव्हा कर्मचाऱ्याने ही बाब पुन्हा बॉसला सांगितली, तेव्हा बॉसने चक्क त्याचे ‘लाईव्ह लोकेशन’ शेअर करायला सांगितले. इतकेच नाही तर, लोकेशन पाहणे ही ‘एचआर पॉलिसी’चा भाग असल्याचे अजब दावेही बॉसने केले.
नेटकऱ्यांनी मॅनेजरला झापले!
ही पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मॅनेजरच्या या ‘मायक्रो-मॅनेजमेंट’वर सडकून टीका केली. युजर्सनी दिलेले काही हटके सल्ले पहा:
-
पुराव्यासाठी काय हवं? फोटो की व्हिडिओ?: एका युजरने संताप व्यक्त करत विचारले, “डोकेदुखीचा पुरावा म्हणून आता काय स्वतःच्या वेदनेचा फोटो पाठवायचा का?”
-
जीपीएस (GPS) हॅकिंगचे व्हिडिओ पहा: एका हुशार युजरने सल्ला दिला की, “गुगलवर फेक जीपीएस कसे सेट करायचे याचे व्हिडिओ पहा आणि त्याला हॉस्पिटलचे लोकेशन पाठवून द्या, म्हणजे त्याचा संशय फिटेल.”
-
अधिकृत ईमेल मागा: “बॉसला म्हणा की ही मागणी व्हॉट्सॲपवर नको, तर अधिकृत ईमेलवर करा आणि त्यामध्ये एचआरला सीसी (CC) ठेवा. एकदा का लेखी पुरावा मिळाला की मग गोपनीयता भंगाचा मुद्दा उपस्थित करून त्यांच्यावरच कारवाई करा.”
-
थेट नकार द्या: “तुमच्या गोपनीयतेचा सन्मान करणे ही कंपनीची जबाबदारी आहे. तुम्ही कुठे आहात याच्याशी कंपनीला काहीही देणंघेणं नाही. थेट नकार द्यायला शिका,” असा सल्ला एकाने दिला.
