भारतातील या भागात मुलीचं-मुलीशी होतं लग्न, भावासाठी बहीण वर बनून मुलीशी करते लग्न

WhatsApp Group

शिमला, कुल्लू आणि मनालीसह हिमाचल प्रदेश केवळ नैसर्गिक सौंदर्यसाठीच प्रसिद्ध नाही, तर येथील काही विवाह विधी देखील प्रसिद्ध आहेत. या वैवाहिक रीतिरिवाजांनी हिमाचल प्रदेशातील काही भागांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये लग्नाच्या वेगवेगळ्या आणि अनोख्या प्रथा आहेत, ज्यामध्ये भाषा आणि भूगोलाच्या आधारावर फरक दिसून येता. पण आज तुम्ही ज्या लग्नाचा विधी वाचणार आहात ती या पूर्वी तुम्ही कधी ऐकलीही नसेल आणि वाचलीही नसेल….

हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती नावाच्या जिल्ह्यात मुलीचं-मुलीशी लग्न करण्याची अनोखी परंपरा आहे. आपण आजवर पाहिलेल्या लग्न सोहळ्यात असे घडते की लग्न ठरल्यानंतर, ठरलेल्या तारखेला आणि वेळेला, वर आणि वधू एकत्र मंडपात बसतात आणि एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतात. आपल्याकडे जर वधू किंवा वर यांच्याशीवाय लग्नाचा विचार पण नाही होऊ शकत, मात्र हिमाचल प्रदेशात अशा प्रसंगाला सामोरे जाण्याचा एत सोपा मार्ग येथील नागरिकांनी शोधला आहे. स्वतःच्या लग्नात काही कारणास्तव नवरा मुलगा लग्नमंडपात उपस्थित न राहिल्यास इथे लग्न थांबत नाही.

परंपरा अशी आहे की, जर नवरा मुलगा स्वतःच्या लग्नाच्या दिवशी अनुपस्थित असेल तर त्याची बहीण वराच्या वेशात त्याच्या जागी मंडपात येते. तिथे वर म्हणून ती तिच्या भावाला कराव्या लागणाऱ्या सर्व विधी पूर्ण करते आणि नवऱ्या मुलीला घेऊन घरी येते. इतकंच नाही तर वराला बहीण नसेल तर त्याचा भाऊ आपल्या भावाऐवजी मंडपात बसतो आणि लग्न झाल्यावर आपल्या वहिनीला सोबत घेऊन येतो.

लाहौल-स्पितीची ही प्राचीन परंपरा आजही सुरू आहे. इथे लग्नाच्या वेळी भावाच्या जागी बहीण वर बनल्याचे अनेकदा पाहायला मिळते. या परंपरेमागे काही विशेष तर्क असल्याचे दिसून येत नाही. लग्नाची शुभ वेळ निघून जाण्याच्या भीतीनेच हे केले गेले असण्याची शक्यता आहे.