एकनाथ शिंदेंना माझ्यामुळे विधानसभेची उमेदवारी मिळाली याचा आज मला पश्चाताप होतोय – विनायक राऊत

WhatsApp Group

मुंबई – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत 40 आमदारांसह भाजपसोबत (BJP) हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवसेनेत आणि त्यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटच्या माध्यमातून “रिक्षाच्या स्पीड पेक्षा मर्सिडीजचा स्पीड फिका पडला” असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना काल लगावला. यावर आता विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

विनायक राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून देतं म्हणून ट्वीट करायचं. स्वत:च्या हाताने त्यांना ट्वीट करता येतं का? याचा शोध घ्यावा लागेल. एकनाथ शिंदे यांना माझ्या मध्यस्थिमुळे विधानसभेची उमेदवारी मिळाली याचा आज मला पश्चाताप होतोय. आयुष्यातील मोठं पाप झालंय. मी सांगितलं नसत तर एकनाथ शिंदेना आमदारकी मिळाली नसती, असं विनायक राऊत म्हणाले.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराला पाठींबा द्यावा असं खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. या पत्रामुळे पुन्हा एकदा राजकीय वादळ उठलंय. लेखी पत्र देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटूनही हे सांगता आलं असतं त्यांचे दरवाजे उघडे होते, असंही खासदार विनायक राऊत यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.