विलास गावडेंना मोठा दिलासा, मनिष दळवींचा आक्षेप निवडणुक अधिकाऱ्यांनी फेटाळला

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – आगामी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. या बॅंक निवडणुकीत भाजप म्हणजे नारायण राणेंविरुद्ध महा विकास आघाडी असं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. यंदाची जिल्हा बॅंक निवडणुक सर्वच राजकीय पक्षांसाठी खास असणार आहे, कारण यंदा राणेंना हरवून संपूर्ण राज्याला जिल्ह्यातील आपली ताकद दाखवायची संधी महा विकास आघाडीकडे असेल तर विरोधकांना धोबीपकछाड देत बॅंकेवरील आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान नारायण राणे यांच्यावर असणार आहे. निवडणुका तोंडावर असताना कॉग्रेससाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकांपुर्वी कॉग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी जिल्हा बॅंक संचालक विलास गावडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपचे जिल्हा बॅंकेचे उमेदवार मनिष दळवी यांनी विलास गावडे विलास यांच्या विरोधात आक्षेप घेतला होता. मात्र हा आक्षेप निवडणुक अधिकारी व कुडाळच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांनी फेटाळून लावला आहे. दोन्ही बाजूंना वकील देण्यात आले होते. मात्र विलास गावडे यांच्या वकिलांने जबरदस्त युक्तीवाद केल्याने अखेर गावडे यांना जिल्हा बॅंक निवडणुकीचा मार्ग मोकळा करुन दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत आज अर्ज छाननी वेळी भाजपचे उमेदवार मनिष दळवी यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विलास गावडे यांच्या विरोधात कुडाळ उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांच्या समोर आक्षेप घेतला होता. हा आक्षेप कुडाळच्या उपविभागीय अधिकारी व निवडणुक अधिकारी वंदना खरमाळे यांनी फेटाळून लावल्याने विलास गावडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता विलास गावडे विरूद्ध मनिष दळवी अशी ही निवडणूक होणार हे स्पष्ट झाले झाल्याने आता या निवडणुकीत चांगली चुरस पाहायला मिळणार, हे मात्र नक्की.