टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन

WhatsApp Group

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (29 नोव्हेंबर) रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. टोयोटा किर्लोस्कर मोटरने दिलेल्या माहितीनुसार, विक्रम एस किर्लोस्कर यांच्या पार्थिवावर बुधवारी बेंगळुरू येथील हेब्बल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टोयोटा इंडियाने मीडिया स्टेटमेंट जारी करून विक्रम किर्लोस्कर यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. निवेदनात असे लिहिले आहे की, “29 नोव्हेंबर 2022 रोजी टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांच्या अकाली निधनाबद्दल आम्हाला कळवताना अत्यंत दु:ख होत आहे. या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच सर्वांची प्रार्थना. आम्ही त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांचे अंतिम संस्कार 30 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता हेब्बल स्मशानभूमी, बेंगळुरू येथे होणार आहेत. किर्लोस्कर समूहाचे चौथ्या पिढीचे प्रमुख विक्रम किर्लोस्कर यांनी त्यांच्या कारकिर्दीत CII, SIAM आणि ARAI मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले.

Join our WhatsApp Group, Instagram, Facebook Page and Twitter for every update