एकनाथ शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळेंवर एक धक्कादायक आरोप केला आहे. शिवतारे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करत म्हंटलं आहे की, सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचे दर्शन घेतले. यामुळे खासदार सुप्रिया सुळे नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे.. विजय शिवतारे यांच्या फेसबुक पोस्टखाली जाऊन अनेकांनी मटण खाऊन दर्शन घेतल्याने सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे Vijay Shivtare on Supriya Sule .
या व्हीडिओसह विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचे देवदर्शन घेतानाच फोटोही शेअर केले आहेत. शिवतारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहीले आहे की, “आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले.येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला”
विजय शिवतारे यांच्या या व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात जोरदार उलट-सुलट चर्चा सुरू आहे. मात्र याबद्दल सुप्रिया सुळे किंवा पवार कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये