
चाहत्यांना साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांची ऑन-स्क्रीन जोडी आवडते. खऱ्या आयुष्यातही त्यांच्या सुपरहिट जोडीला एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. अनेकदा हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा उडत राहतात. अनेकवेळा हे दोघे हॉलिडे आणि डेटींगसाठी एकत्र बाहेर जात असल्याच्या बातम्या आल्या आहेत, मात्र त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. रश्मिका मंदान्ना आणि विजय देवराकोंडा यांनी नवीन वर्षाच्या सुट्टीवर जाण्याबद्दल कोणालाही माहिती दिली नसली तरी, समोर आलेल्या छायाचित्रांवरून हे समजले आहे की दोघेही नवीन वर्षाच्या सुट्टीत बाहेरच साजरे करत आहेत.
विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन वर्षाची सुट्टी साजरी करताना काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर पुन्हा एकदा ही जोडी एकत्र सुट्टी साजरी करत असल्याचं दिसत आहे. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर चाहत्यांनी सांगितले की, दोघेही एकत्र असून त्यांची सुट्टी एकत्र साजरी करत आहेत. दोघांनाही सांगायचे नसले तरी ही छायाचित्रे त्यांच्या एकत्र असल्याचा पुरावा आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
रविवारी, नवीन वर्षाच्या निमित्ताने, विजय देवरकोंडा याने स्वतःचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो पाण्याने भिजलेल्या शॅम्पेनसह समुद्राच्या लाटांच्या मध्यभागी शर्टलेस पोज देताना दिसत आहे. अभिनेत्याने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात समुद्रकिनार्यावर संस्मरणीय वेळेसह केली. दुसरीकडे, विजयच्या काही वेळातच रश्मिकानेही इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती बीचवर आराम करताना दिसत होती.
View this post on Instagram