कोण आहेत या नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य

WhatsApp Group

मुंबई – खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसा पठणाचा चंगच बांधला आहे. दिल्लीतल्या एका हनुमान मंदिरामध्ये जाऊन ते महाआरती करणार आहेत. दरम्यान, या सगळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी राणांवर वादग्रस्त शब्दांत टीका केली आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा आज दिल्लीतल्या हनुमान मंदिरामध्ये महाआरती करणार आहेत. त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी नवनीत राणांवर जोरदार टीका केली आहे.

विद्या चव्हाण बोलताना म्हणाल्या, “कोणीही उठसूट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा अपमान करतो, हे कितपत योग्य आहे? आणि कोण आहेत या नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांच्याबद्दल सर्वांना माहित आहे. खोटं जात प्रमाणपत्र दाखवून त्या खोट्या खासदार झाल्या आहेत. त्यांना एवढं महत्त्व द्यायची गरज नाही. माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी हे दाम्पत्य असा प्रकार करत आहेत.

यावेळी बोलताना विद्या चव्हाण यांनी रवी राणा यांच्यावरही टीका केली आहे. निवडणुकीमध्ये मतं मिळवण्यासाठी त्यांनी मतदारांना आमिषं दाखवल्याचेही त्यांनी सांगितलं. चव्हाण म्हणाल्या, “राणा दाम्पत्य अमरावतीमध्ये काय करत होतं, हे सगळ्यांना माहित आहे. रवी राणांनी निवडणुकीच्या वेळी मतदारांना कुकर वाटले. पण कुकरला झाकणच नव्हतं. महिला त्यांना विचारायला गेल्या. तर रवी राणा म्हणाले की मला मतं दिल्यानंतर तुम्हाला झाकणं देतो. असं विद्या चव्हाण यावेळी बोलताना म्हणाल्या आहेत.