VIDEO: व्हिडीओ काढण्याच्या नादात महिलेने गमावला जीव, व्हीडिओ व्हायरल

WhatsApp Group

मुंबई : समुद्रकिनारी अनेक वेळा लोक अशा चुका करतात, ज्याचे परिणाम त्यांना जीव गमावून भोगावे लागतात. मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँड येथे असाच एक प्रकार उघडकीस आला असून, येथे एका 27 वर्षीय महिलेचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना रविवार 9 जुलै रोजी सायंकाळी घडली. पोलिसांनी सांगितले की, ही महिला आपल्या पतीसोबत समुद्रकिनारी एका दगडावर उभी असताना सेल्फी घेत होती आणि तेवढ्यात एक मोठी लाट आली ज्यामध्ये महिला वाहून गेली तर पतीला तिथे उभ्या असलेल्या लोकांनी वाचवले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि महिलेचा शोध सुरू केला मात्र महिलेला वाचवता आले नाही. या महिलेचे नाव ज्योती सोनार असून पतीचे नाव मुकेश सोनार असल्याचे वांद्रे पोलिसांनी सांगितले.

घटना कधी घडली?
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना रविवारी संध्याकाळी 5:12 वाजता घडली. वांद्रे विभागाचे एसीपी भूषण बेळणेकर यांनी इंडिया टीव्हीला सांगितले की, आम्ही या प्रकरणी एडीआर घेतला आहे, आम्ही लोकांना हायटाइडच्या वेळी बँडस्टँडला भेट देण्यास बंदी घातली आहे आणि लोकांना आता तेथे न जाण्याची विनंती केली आहे. ते पुढे म्हणाले की, महिला आणि तिचा पती एका दगडावर उभे असताना मागून मोठी लाट आली आणि ही घटना घडली.