VIDEO: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे सीसीटीव्हीत कैद

0
WhatsApp Group

अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर रविवारी पहाटे 4.55 वाजता गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अनोळखी लोक मोटारसायकलवरून पळताना दिसत आहेत. CNN-News18 च्या प्राथमिक अहवालानुसार, दोन पुरुष मोटरसायकलवर आले आणि त्यांनी अभिनेत्याच्या घराबाहेर हवेत तीन गोळ्या झाडल्या.

मुंबई पोलिसांनी ANI च्या हवाल्याने सांगितले की, “आज पहाटे 5 च्या सुमारास दोन अज्ञात लोकांनी अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार केला. पोलिसांना तीन राऊंड गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा तपासासाठी घटनास्थळी पोहोचली आहे.

या घटनेनंतर अभिनेत्याच्या निवासस्थान गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी मुंबई पोलीस सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत. वांद्रे पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.