Video: थोडक्यात वाचली रिया चक्रवर्ती, नाहीतर…

WhatsApp Group

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हळूहळू तिच्या आयुष्याच्या ट्रॅकवर परतत आहे. ही अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. याशिवाय ती बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्येही दिसते.

मात्र, ती जेव्हा जेव्हा बाहेर येते तेव्हा फोटोग्राफर्सच्या नजरेतून ती सुटत नाही. अलीकडेच सोशल मीडियावर रिया चक्रवर्तीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती कारमधून उतरल्यानंतर वेगाने चालत असताना तिचा तोल जातो आणि ती तोंडावर पडता पडता वाचते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रिया चक्रवर्ती मंगळवारी सकाळी मुंबईतील वांद्रे येथे स्पॉट झाली. यादरम्यान मीडिया फोटोग्राफरने अभिनेत्रीला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. ती तिच्या कारमधून बाहेर पडते आणि एका दुकानाकडे वेगाने चालते जेव्हा ती अडखळते आणि तिचा तोल गमावते. ती तोंडावर पडता पडता वाचते. नंतर रिया पाठीमागून येणाऱ्या फोटोग्राफरला सांगते की ‘तुम्ही लोकांनी असा पाठलाग केला तर असंच होईल ना…’ . असे बोलून ती तिथून निघून जाते. हा व्हिडिओ फोटोग्राफर वायरल भयानी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. युजर्स रियाला प्रचंड ट्रोल करत आहेत.