धवन – चहलने ‘बाबू जी जरा धीरे चलो’ गाण्यावर लगावले ठुमके, पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू आणि गब्बर म्हणून ओळखला जाणार शिखर धवन(Shikhar Dhawan) आणि लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) दोघे सध्या चांगलेचं चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर दोघेही नेहमी अॅक्टीव्ह असतात. दरम्यान, दोघांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे. या व्हिडिओमध्ये शिखर आणि चहल ‘बाबू जी जरा धीरे चलो’ गाण्यावर ठुमके लगावताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

आयपीएल 2022 पूर्वी टीम इंडियाचे अनेक खेळाडू सध्या बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेस सुधारण्यामध्ये गुंतले आहेत. यामध्ये केएल राहुल, धवन, चहल, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि यांचा समावेश आहे. धवनने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो चहलसोबत ‘दम’ चित्रपटातील ‘बाबू जी जरा धीरे चलो’ या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसतं आहे.