
मुंबईत एका 35 वर्षीय महिलेला कुत्र्यावर अॅसिड फेकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी घडली. मुंबईतील मालाड-मालवणी येथे एका 35 वर्षीय महिलेला कलम 429 भादंवि आणि 11(1) (अ) प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
महिलेने तिच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या कुत्र्यावर अॅसिड फेकले होते, त्यामुळे तो भाजला होता. महिलेचे हे कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्याआधारे मालवणी पोलिसांनी कारवाई केली आहे.
ब्राउनी नावाचा कुत्रा त्या महिलेच्या मांजरीशी खेळत असायचा त्यामुळे ती महिला नाराज होती. तिने कुत्र्यांच्या मालकांना तिच्या मांजरीपासून दूर राहण्याचा इशारा दिला, परंतु त्यांनी तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. याचा राग येऊन आरोपी महिलेने 16 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास कुत्र्यावर अॅसिड ओतले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला कुत्र्याजवळ जाऊन त्यावर अॅसिड टाकताना दिसत आहे, तर कुत्रा वेदनेने ओरडत पळताना दिसत आहे.