Mumbai Monsoon Rain | मुंबई पहिल्याच पावसात तुंबली

0
WhatsApp Group

मुसळधार पावसामुळे मुंबई शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. पावसामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी शनिवारी मुख्यमंत्री शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

गायकवाड यांनी एका महिला रस्ता ओलांडण्यासाठी धडपडतानाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर इतर पुरुष तिला मदत करताना दिसत आहेत. पावसामुळे अनेक गाड्या अडकल्याचेही येथे पहायला मिळत आहे.