Video: कोल्हापुरात नवरदेवाकडून वरातीदरम्यान गोळीबार, पुढे झालं असं काही…

WhatsApp Group

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असतो. हा दिवस आणखी खास बनावा यासाठी नवरी आणि नवरदेवाकडून काहीतरी खास आणि हटके करण्याच्या प्रयत्न केला जातो. मात्र, कधीकधी उत्साहाच्या भरात ते असं काही करतात, ज्यामुळे चांगलेच अडचणीत येतात. अशीच एक घटना नुकतीच कोल्हापुरातून समोर आली आहे.

व्हिडिओमध्ये पाहू शकता नवरदेवाने वरातीत चक्क बारा बोअरच्या बंदुकीने हवेत गोळीबार केला. मात्र, हा प्रकार नवरदेवाला चांगलाच अंगलट आलं आहे. या प्रकरणी नवरदेव अजयकुमार पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा