
हरियाणा : यमुना नगरमध्ये आज बुधवारी रावण दहन करताना मोठा अपघात झाला आहे. येथे रावणदहनाच्या वेळी रावणाचा जळता पुतळा लोकांवर पडला. यामध्ये काही जण जखमी झाले. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. शहरातील दसरा मैदानात रावणाच्या जाळलेल्या पुतळ्यातील लाकडे काढणे जनजीवनावर संकट ठरले. लाकूड काढताना 70 फुटाचा पुतळा पडला. ज्याखाली सात जण दबले गेले.
विजयादशमीच्या दिवशी बुधवारी रात्री उशिरा रावत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यासोबतच मेघनाथ आणि कुंभकरण यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अचानक रावणाचा पुतळा जळणाऱ्या लोकांवर पडला. लोकांवर पुतळा पडल्यामुळे चेंगराचेंगरीचे वातावरण निर्माण झाले, पोलीस स्टेशन प्रभारी कमलजीत यांना पोलीस कर्मचार्यांसह लोकांना बाहेर काढावे लागले. सरोजिनी कॉलनीतील सुरेंद्र कुमार, पुराण हमीदा येथील विक्रम, बँक कॉलनीतील राकेश, बारी माजरा येथील मोहित, दीपक पुतळ्याखाली दबल्यामुळे जखमी झाले. पुतळ्याखालून बाहेर आल्यानंतर सात जणांमध्ये घबराट आणि भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.
#WATCH | Haryana: A major accident was averted during Ravan Dahan in Yamunanagar where the effigy of Ravana fell on the people gathered. Some people were injured. Further details awaited pic.twitter.com/ISk8k1YWkH
— ANI (@ANI) October 5, 2022
यापूर्वी 2018 मध्ये विजयादशमीच्या दिवशी अमृतसर, पंजाबमध्ये मोठा अपघात झाला होता. त्यावेळी प्रशासनाने एका मोठ्या रेल्वे अपघातात 61 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली होती. अमृतसर आणि मनवाला दरम्यान गेट क्रमांक 27 जवळ हा अपघात झाला होता. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी रावण दहन पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. दरम्यान, डीएमयू गाडी क्रमांक 74943 तेथून जात होती. रावण दहनाच्या वेळी फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे लोकांना ट्रेनचा हॉर्न ऐकू आला नाही. त्यामुळे हा अपघात झालेला.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा