
अभिनेत्री शिवाली परबने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून आपली ओळख निर्माण केली आहे. शिवालीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलंय. अफलातून अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. शिवाली ‘प्रेम प्रथा धुमशान’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘प्रेम प्रथा धुमशान’ चित्रपटामध्ये प्रेक्षकांना शिवालीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे. शिवाली पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटातील ‘काय उमगेना’ हे रोमॅंटिक गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात शिवालीने लिपलॉकिंग सीन दिले आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामधूनन प्रेक्षकांना हसवणाऱ्या शिवालीचा बोल्ड अंदाज पाहून चाहते अवाक आहेत.