मुंबई – सध्या भारतात लग्नांचा मोसम सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाची जोरात चर्चा सुरू आहे. दोघांचे लग्न हे राजस्थानमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विकी-कॅटचा विवाहसोहळा 7 ते 9 डिसेंबर दरम्यान होणार असून या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळी सहभागी होणार आहेत.
राजस्थानमधील ‘सिक्स सेन्स फोर्ट बरवारा (Six Senses Fort Barwara) येथे हे सेलिब्रिटी लग्न होणार आहे. हे आलिशान रिसॉर्ट राजस्थानमधील सवाई माधोपुर येथे आहे. विकी आणि अभिनेत्री कॅट हिंदू पद्धतीने लग्न करणार आहेत, हे लग्न तब्बल तीन दिवस चालणार असून त्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
फिल्मफेअरने एक ट्वीट करत म्हटले आहे की, विकी कौशल आणि कतरिना कैफ हे 7 ते 9 डिसेंबर दरम्यान राजस्थानमध्ये लग्न करणार आहेत.
CONFIRMED! #KatrinaKaif and #VickyKaushal will have a three-day celebration in Rajasthan from December 7-9, where the two will tie the knot with family and friends from the industry. pic.twitter.com/CKn3fn1bTo
— Filmfare (@filmfare) November 27, 2021
मिळालेल्या माहितीनूसार दोघेही सवाई माधोपुरच्या 700 वर्ष जुन्या किल्ल्यात लग्न करणार आहेत. एवढेच नाही तर लग्नाच्या ठिकाणी मोबाईल नेण्यासही बंदी असणार आहे. येत्या 9 डिसेंबरला कतरिना विक्की कौशलची कायमची होणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. गेले अनेक महिने या दोन्ही सेलिब्रिटींच्या लग्नाच्या चर्चा पूर्ण भारतात सुरू आहेत. काही दिवसांपूर्वींच दिवाळीला या दोघांचा रोका दिग्दर्शक कबीर खानच्या घरी झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
याआधी सलमान खानचे वडील सलीम खान यांनी विकी-कॅटच्या लग्नाच्या बातमीवर म्हटले होते की, ‘मी याबद्दल काय बोलू, मीडियाकडे आता बोलण्यासारखा फक्त हा एकच विषय राहिला आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नापूर्वी सलमान आणि कतरिनाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारत चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आहे.
View this post on Instagram