कलाविश्वावर पसरली शोककळा, प्रसिद्ध गायक बप्पी लाहिरी यांचं निधन

WhatsApp Group

मुंबई – 70 च्या दशकात बॉलीवूडला डिस्को आणि रॉक संगीताची ओळख करून देणारे संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास बप्पी लाहिरी यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बप्पी लाहिरी हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. बप्पी लाहिरी यांचा आवाज आणि संगीत इतरांपेक्षा वेगळा होता. याशिवाय त्यांची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे भरपूर सोन्याचे दागिने घालण्याची. ‘बप्पी दा’ सोन्याचे खूप शौकीन होते म्हणून त्यांना ‘गोल्ड मॅन’ म्हणूनही ओळखले जायजे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी गायली आहेत. त्यांनी जज म्हणूनही अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम पाहिलं आहे.


बप्पी लाहिरी यांनी 70 च्या दशकात फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि 80 च्या दशकात आपला दबदबा निर्माण केला. प्रत्येक चित्रपटात गाण्यासाठी ते निर्मात्यांची पहिली पसंती असायचे. 1975 मध्ये आलेल्या ‘जख्मी’ चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली.

‘बप्पी दा’ यांनी गायलेली ‘बॉम्बे से आया मेरा दोस्त, डिस्को डान्सर, जुबी-जुबी, याद आ रहा है तेरा प्यार, यार बिना चैन कहां रे, तम्मा तम्मा लोगे’ ही गाणी आजही लोकांच्या ओठावर कायम आहेत. शराबी या चित्रपटासाठी ‘बप्पी दा’ यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.