
मराठी चित्रपटसृष्टी व मालिकांमधील कलाकार राजा (चंद्रकांत) बापट यांचं हिंदुजा रुग्णालयामध्ये हृदयरोगाने निधन झालं आहे. त्यांनी 85व्या वर्षी जगाचा अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा, मुलगी शिल्पा (गौरी) व जावई गिरीश म्हसकर आणि नातवंडे असा परिवार आहे. राजा बापट यांच्यावर सोमवारी दुपारी शिवाजी पार्क विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजा बापट यांनी ‘जावई विकत घेणे आहे’, ‘थोरली जाऊ’, ‘व्हेंटिलेटर’, ‘प्रीत तुझी माझी’, ‘एकटी’, ‘बाळा गाऊं कशी अंगाई’, ‘एकटी’ आणि ‘नवरे सगळे गाधव’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘बाळा गाऊं कशी अंगाई’ या सिनेमातील भूमिकेमुळे ते घराघरांत पोहोचले.