
Veteran actor Chalapathi Rao passes away : तेलगू चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. टॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते चलपती राव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. 78 वर्षीय अभिनेत्याच्या निधनाने चाहते आणि कुटुंब दोघांनाही धक्का बसला आहे. अभिनेता दीर्घकाळापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होता.
चालपती राव यांनी अभिनय जगतापासून बरेच दिवस अंतर ठेवले होते. ते विनोदी आणि खलनायकी भूमिकांसाठी ओळखला जात होते. आपल्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास 600 चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी ‘साक्षी’, ‘ड्रायव्हर रामुडू’ आणि ‘वज्रम’ सारखे हिट चित्रपट दिले आहेत. एवढेच नाही तर सलमान खानच्या ‘किक’ या चित्रपटातही हा अभिनेता दिसला होता.