पुणे – 70 आणि 80 च्या दशकात सामान्य माणसाची भूमिका साकारणारे लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जाणारे अमोल पालेकर यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असं त्यांच्या पत्नी संध्या गोखले यांनी सांगितले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्यासारखे काही नाही, असंही संध्या गोखले यांनी सांगितले आहे.
अमोल पालेकर यांनी आपल्या सुंदर अभिनयाने 70 आणि 80 चे दशक गाजवले आहे. एकीकडे अमिताभ आणि राजेश खन्नासारखे यांच्यासारखे सुपरस्टार होते, तर दुसरीकडे अमोल पालेकर होते. गोलमाल, छोटी सी बात, रजनीगंधा, चिचोर यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी सामान्य माणसाच्या भूमिका साकारल्या आहेत.
त्यांनी केवळ हिंदीच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. ‘आक्रीत’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका आजही लोकांना आठवते.