विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी

WhatsApp Group

Sindhudurg Rain News: गेल्या दोन दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे.  उद्या म्हणजेच सोमवारीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्याचे आदेश दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्याच्या कलेक्टरना दिले आहेत. अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याची करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणी पाणीच झाले आहे.काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे.तर पावसाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

कोकणात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृष्य पाऊस सुरू आहे. येथील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कुडाळ, कणकवली, देवगड तालुक्यात देखील अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.