दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

WhatsApp Group

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य (Attendance Compulsory) करण्यात येणार आहे. पुढील वर्षापासून हा निर्णय लागू करण्यात येईल. यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम लागू नव्हता. मात्र, आता मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे. याबाबत सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना आदेश देण्यात आले आहेत.

शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, किमान 75 टक्के उपस्थिती असल्याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. किमान 75 टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांनाचं प्रवेशपत्रे देण्यात येतील. त्यामुळे शाळा चुकावणाऱ्या विद्यार्थांना आता या आदेशाचा चांगलाचं फटका बसणार आहे.