
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर एका मोठ्या अपघाताचा बळी ठरला. दुलीप ट्रॉफी सामन्यात सेंट्रल झोनकडून खेळत असलेल्या व्यंकटेश अय्यरच्या डोक्याला चेंडू लागला. चेंडू लागताच व्यंकटेश अय्यर जमिनीवर पडला आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. व्यंकटेश अय्यर पश्चिम विभागाचा खेळाडू चिंतन गाजाच्या थ्रोवर जखमी झाला. हा थ्रो इतका वेगवान होता की, चेंडू लागताच व्यंकटेश अय्यर जमिनीवर पडला आणि त्यानंतर मैदानावर रुग्णवाहिका बोलवावी लागली.
व्यंकटेश अय्यरसोबतची ही घटना दुलीप ट्रॉफी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रादरम्यान घटना घडली. चिंतन गाजाचा सरळ थ्रो व्यंकटेशच्या डोक्याला लागला. चेंडू लागताच तो जमिनीवर आडवा झाला. चेंडू त्याच्या मानेला लागला आणि तो वेदनेने रडू लागला. अय्यरने लगेच हेल्मेट काढले आणि मैदानावर उभे असलेले इतर खेळाडू त्याला मदत करण्यासाठी पोहोचले. यानंतर वैद्यकीय पथक तातडीने व्यंकटेश अय्यर येथे पोहोचले. व्यंकटेश अय्यरची प्रकृती पाहून रुग्णवाहिका बोलावली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले.
Venkatesh Iyer is back on the field but what Gaja did is unacceptable.
📸: @peri_periasamy pic.twitter.com/oLTR0Y0aml
— KnightRidersXtra (@knightridersxtr) September 16, 2022
मैदानात नेमकं काय घडलं?
सामन्यात गाजाच्या चेंडूवर व्यंकटेशने षटकार ठोकला होता. यामुळे गाजा नाराज झाला होता. गाजाचा पुढचा चेंडू व्यंकटेशने समोरून बचावला. मात्र गोलंदाज गाजाने चेंडू विनाकारण थ्रो केला. त्यावेळी वेंकटेशनला स्वत:ला वाचवण्याची संधी मिळाली नाही. चेंडू थेट त्याच्या डोक्यावर जाऊन आदळला.