वेंगुर्ला, तुळस श्री देव जैतिर देवाचा वार्षिक उत्सव आजपासून

WhatsApp Group

वेंगुर्ला – दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान, नराचा नारायण म्हणून सुपरिचित असलेले तुळस गावचे ग्रामदैवत श्री जैतीर देवाचा वार्षिक उत्सव आजपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिरांची रंगरंगोटी करण्यात आली आहे, मंदिर परिसरामध्ये दुकानेही थाटण्यात आली आहेत. अकरा दिवस चालणाऱाऱ्या या उत्सवासाठी तुळस गाव सज्ज झाले आहे.

जागृत असलेल्या या देवाच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगाव, सिंधुदुर्ग व नजीकच्या गोवा राज्यामधून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे या उत्सवावर मंदीचे सावट होते; मात्र अलीकडेच कोरोना संसर्ग संपुष्टात आल्याचं चित्र असल्यामुळे पूर्वीप्रमाणेच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळणार आहे. त्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी श्री देव जैतीर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्यावतीने चोख नियोजन करण्यात आले आहे.