श्रीगोंदा तालुक्यामधील राहणारे एरंडोली गावचे सुपुत्र शहीद सुभेदार ज्ञानेश्वर सखाराम मोरे (वर्षे 44) यांचे 23 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये देश सेवेत कार्यरत असता 27 फेबु्रवारीला त्यांना वीरमरण आले आहे. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी एरंडोली याठिकाणी नेण्यात येणार असून त्यांच्यावर आज (मंगळवारी) शासकीय इतमामात एरंडोलीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
शहीद सुभेदार मोरे यांनी 23 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये 18 वर्षे सेवा पूर्ण केली असून त्यांनी दोन वर्षे जादा सेवा केल्यानंतर ते पुन्हा सहा महिने सेवा करत होते. यादरम्यान हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये ते जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना वीरमरण आले आहे.