Ved Trailer : पाहा रितेश-जेनिलियाच्या ‘वेड’ चित्रपटाचा ट्रेलर

WhatsApp Group

रितेश देशमुखच्या ‘वेड’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे Ved Trailer. हा सिनेमा 30 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वेड’ या सिनेमात रितेश देशमुखसह Riteish Deshmukh जेनेलिया देशमुख Genelia Deshmukh, अशोक सराफ, विद्याधर जोशी आणि शुभंकर तावडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

रितेश देशमुखने 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि नंतर ‘मस्ती’, ‘क्या कूल हैं हम’, ‘ब्लफमास्टर!’, ‘मालामाल वीकली’, ‘ग्रँड मस्ती’, यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला. ‘एक व्हिलन’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अभिनेता अलीकडेच त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझासोबत ‘इंडियन आयडॉल 13’ या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता