वट सावित्री व्रत यावर्षी 3 जून, शनिवारी आहे. विवाहित महिलांसाठी हा एक महत्त्वपूर्ण उपवास मानला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार अखंड सौभाग्य मिळविण्यासाठी हा व्रत दरवर्षी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पाळला जातो. या व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. ही धार्मिक श्रद्धा आहे की सावित्रीने ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी यमराजपासून पती सत्यवान यांचे प्राण वाचविले. म्हणूनच वट सावित्री व्रत विवाहित स्त्रियांद्वारे पतींच्या दीर्घ आणि आनंदी आयुष्यासाठी ठेवला जातो.
या लेखातून आम्ही तुमच्यासाठी खास वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. तुम्हीही वटपौर्णिमेच्या शुभेच्छा तुमच्या संदेशांनी खास करू शकता. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी हे खास संदेश.
- मोठ्यांचा आशीर्वाद, पतीचे प्रेम, सर्वांच्या शुभेच्छा लाभू द्या! वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
- वटसावित्री पूजेच्या हार्दिक शुभेच्छा! हाच जन्म नव्हे तर प्रत्येक जन्मी तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळावा हीच सदिच्छा!
- सात जन्माची साथ, हाती तुझा हात..वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
- कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या, धन्याला मिळू द्या दीर्घायुष्य…वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
- मंगळसूत्र करून देते आठवण दिलेल्या वचनांची, पाळेन मी सात जन्म आणि देईन तुला साथ…वटपौर्णिमेच्या हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा!
- कायम राहो तुझी अशीच साथ, दीर्घायुष्य लाभो खास! वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
- वटपौर्णिमेचा दिवस हा खास…लागून राहिली आहे साता जन्माची आस!
- तुझ्याशिवाय आयुष्य जगणं सहनच होऊ शकत नाही. तुला दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
- वडाप्रमाणे तुझं आयुष्य असो आणि तुझं सुख असचं वडाच्या फांद्याप्रमाणे पसरत जावो …वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
- सण हा सौभाग्याचा, सुखाचा आणि भाग्याचा…वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Vat Purnima Ukhane: वटसावित्री पौर्णिमा स्पेशल काही भन्नाट उखाणे…
- सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
- या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावास तू, जन्मोजन्मी माझा आणि माझाच असवास तू…वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
- वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य मिळो तुला, जन्मोजन्मी तुझा सहवास लाभो मला – वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
- मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण बांधूनी नात्याचे बंधन करेन साता जन्माचे समर्पण – वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
- एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
- प्रार्थना सौभाग्याची, पूजा वटपौर्णिमेची!
- पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन, सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचं समर्पण वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
- लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ अशीच कायम राहो पती – पत्नीची दृढ साथ …वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा
- विचार आधुनिक आपले जरी, श्रद्धा देवावर आपली, करण्या रक्षण सौभाग्याचे करूया वटपौर्णिमा साजरी
- वटपौर्णिमेला सुवासिनी पूजतात वड सावित्रीच्या आठवणीने होते अंतःकरण जड…वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!