Vat Purnima Ukhane: महाराष्ट्रात वट पौर्णिमा (Vat Purnima) अर्थात ज्येष्ठ पौर्णिमेला सवाष्ण महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. यंदा हा सण 3 जून 2023 दिवशी साजरा केला जात आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ते पौर्णिमा अशा तीन दिवसांचे त्यासाठी व्रत ठेवण्याची पद्धत आहे. या दिवशी महिला साजशृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात.
ग्रामीण भागात मैत्रिणींसोबत हा सण साजरा करताना काही खेळ खेळले जातात. या दरम्यान वटपौर्णिमेच्या पूजा निमिताने एकत्र जमल्यानंतर एक हट्ट हमखास केला जातो तो म्हणजे उखाणांचा.आम्ही तुमच्या करता काही खास उखाणे घेऊन आलो आहोत जे उखाणे घेऊन खेळाला अजुन रंगत आणु शकता.
- तीन वर्षातून एकदा येतो अधिकमास…रावांचे नाव घेते आज केला वटपौर्णमेचा उपवास
- वटवृक्ष सांगतो, सत्यवान-सावित्रीचा इतिहास……रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेसाठी खास
- वडाची पूजा करून, मागितले दीर्घायुष्याचे दान……रावांसोबत, मी संसार करीन छान
- वडाच्या झाडाला घातल्या, प्रदक्षिणा एकशे आठ……रावांसोबत बांधली, मी जन्मोजन्मीची गाठ
- रामाने सीतेसाठी, उचलले शिवधनुष्य……रावांसाठी मागते, देवाकडे दीर्घायुष्य
- वटपौर्णिमेला आहे, वडाला खूपच महत्त्व……रावांची वाढत राहो, कीर्ती आणि कर्तृत्व
- पतिव्रता धर्माचा, सावित्री आहे आदर्श……रावांचे नाव घेताना, होतो खूपच हर्ष
- वटपौर्णिमेचे व्रत, निष्ठेने करते……रावांसाठी मी, दीर्घायुष्य मागते
- सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न….रावांसोबत झाले आताच माझे लग्न
- वडाची पूजा मनोभावे करते वटपौर्णिमेच्या दिवशी….. रावांसाठी दीर्घायुष्य मागते सर्वांना ठेऊन
- देवीची भरली ओटी वाचला देवीचा पाठ….. रावांबरोबर बांधली जन्मोजन्माची गाठ
- जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी…… रावांची साथ जन्मोजन्मी असावी
- वृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा…रावांचे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा
- पानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन…रावांचं नाव घेते …ची सून
- भरजरी साडीला जरीचा खण… रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण
- दाराच्या अंगणात प्राजक्तांच्या फुलांचा सडा वटपौर्णिमेचा सण आज हातात भरते … रावांच्या नावाचा हिरवा चुडा
- वडाची पूजा आज मनोभावे करते… रावांसाठी दीर्घायुष्य मागते
- दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,………चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी
- वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस,….रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस
- आज आहे वटपौर्णिमा, म्हणून ठेवलाय मी उपवास,….रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाखातर खास