![WhatsApp Group WhatsApp Group](https://insidemarathi.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Add.gif)
Vat Purnima Wishes In Marathi: वट सावित्री व्रत विवाहित महिलांसाठी हा एक महत्त्वपूर्ण उपवास मानला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार अखंड सौभाग्य मिळविण्यासाठी हा व्रत दरवर्षी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पाळला जातो. या व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. ही धार्मिक श्रद्धा आहे की सावित्रीने ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी यमराजपासून पती सत्यवान यांचे प्राण वाचविले. म्हणूनच वट सावित्री व्रत विवाहित स्त्रियांद्वारे पतींच्या दीर्घ आणि आनंदी आयुष्यासाठी ठेवला जातो.
आम्ही तुमच्यासाठी खास वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. तुम्हीही वटपौर्णिमेच्या शुभेच्छा तुमच्या संदेशांनी खास करू शकता. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी हे खास संदेश.
एक फेरा तुमच्या आरोग्यासाठी
एक फेरा तुमच्या प्रेमासाठी
एक फेरा तुमच्या यशासाठी
एक फेरा तुमच्या दीर्घायुष्यासाठी
एक फेरा तुमच्या आणि माझ्या सातजन्माच्या नात्यासाठी
वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सुख-दुःखात कायम सोबत राहू,
एकच नाहीतर सात जन्मात एकमेकांचे होऊ
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा!
वटपौर्णिमेचा सण असेच आयुष्यभर लाभो
माझ्या ह्यांच्या जीवनात आनंद व सुख लाभो
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन,
सात जन्माच्या सोबतीसाठी संपूर्ण समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
साथ सात जन्मांची, त्यागाची
नात्यांतल्या प्रेमाची अन् विश्वासाची
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
वडाच्या झाडा एवढे दीर्घायुष्य लाभो तुम्हाला
जन्मोजन्मी तुमचाच सहवास लाभो मला
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Vat Purnima Ukhane: वटसावित्री पौर्णिमा स्पेशल काही भन्नाट उखाणे…
लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ
अशीच कायम राहो पती-पत्नीची प्रेमळ साथ
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
परीक्षा सौभाग्याची, पूजा वटपौर्णिमेची
वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सुख: दु:खात आपण नेहमी एकमेकांसोबत राहू,
एकाच जन्मात नाही तर सात जन्मात पती-पत्नी राहू
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
दोन क्षणाचे भांडण, सात जन्माचे बंधन
तुमच्या सहवासाने झाले मी पावन
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्यासाठी वटवृक्षाकडे एकच मागते,
चेहऱ्यावर तुमच्या नेहमी हसू आणि आनंद राहो,
सूर्याच्या तेजाप्रमाणे संसार आपला
आयुष्यभर आनंदाने उजळत राहो,
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की Add व्हा https://chat.whatsapp.com/FT9G2GTaGLm4DsImkvflms
For more updates, be socially connected with us on – Instagram, Twitter, Facebook