
मुंबई – तीन शहरांच्या नामांतरावरून बोलविलेल्या ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झाली आहे. मात्र, त्यावेळीच काँग्रेसचे मंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख बैठकीतून बाहेर पडले आहेत. याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कालच्या बैठकीमध्ये मंत्री अनिल परब यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर कारावे, उद्याच्या बैठकीत यावर ठराव संमत करावा अशी मागणी करण्यात आली होती. याचबरोबत उस्मानाबादचे देखील नामांतर प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. या शहराचे नाव धाराशिव असं करण्याची मागणी आहे. ठाकरे सरकारवर बहुमत चाचणीची टांगती तलवार असताना २४ तासांत दुसरी मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे.