Vande Bharat Express: भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आग

0
WhatsApp Group

भोपाळहून नवी दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या वंदे भारत ट्रेनला भीषण अपघात झाला आहे. सोमवारी ही गाडी बिना स्थानकावर उभी असताना या गाडीला आग लागली. आगीची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि गाडी मध्यभागी थांबवूनच प्रवाशांना खाली उतरावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळहून हजरत निजामुद्दीनला जाणारी वंदे भारत ट्रेन (20171) सोमवारी पहाटे 5.40 वाजता भोपाळ रेल्वे स्टेशनवरून निघाली होती. यादरम्यान ट्रेनच्या सी 14 क्रमांकाच्या डब्याला आग लागली. या डब्यात सुमारे 36 प्रवासी होते.

ट्रेनला आग कशी लागली?

मिळालेल्या माहितीनुसार, कुरवई केथोरा स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसच्या बॅटरी बॉक्समध्ये आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या पथकाने अग्निशमन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. आगीमुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवाशांना वेळेवर ट्रेनमधून बाहेर काढण्यात आले. तपास करून लवकरच गाडी रवाना केली जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पीएम मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट

वंदे भारत ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे. पंतप्रधान मोदींनी अनेक राज्यांना वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे. नुकतीच मध्य प्रदेश आणि दिल्ली ते डेहराडूनसाठी वंदे भारत ट्रेनही सुरू करण्यात आली आहे. वंदे भारत ट्रेनवर अनेकदा दगडफेकीच्या बातम्याही समोर आल्या आहेत.