![WhatsApp Group WhatsApp Group](https://insidemarathi.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Add.gif)
Tanaji Sawant : शिवेसेनचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे जवळपास 40 आमदार घेऊन आसाममधील गुवाहटीमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहे. काही ठिकाणी आंदोलने, मोर्चे निघत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच शिवेसेनेचे भूम-परांडा तालुक्याचे बंडखोर आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांकडून हल्ला केल्याची घटना घडली आहे. तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावर हल्ला करण्यात आला असून, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.