वंचित बहुजन युवा आघाडीचा 15 सप्टेंबरला समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयावर मोर्चा!

पुणे – वंचित बहुजन युवा आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने विविध विद्यार्थी प्रश्नांना घेऊन समाज कल्याण आयुक्त, महाराष्ट्र कार्यालय पुणे येथे मा.खासदार ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शानाखाली वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, महासचिव राजेंद्र पातोडे आणि महेश भारतीय यांच्या प्रमुख उपस्थितीत हे धरणे आंदोलन पार पडणार आहे.
कोविड 19 पासून प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्ती, वस्तीगृहांचे प्रश्न, इबीसी, केंद्र आणि राज्य सरकारचे शिष्यवृत्ती, कृषी पीएचडी फेलोशिप, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची थकीत वेतन आणि पेन्शन, पोषण आहार, ओबीसी परराज्य विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, परदेशी जाणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे बाबत अशा विविध प्रश्नांवर, इयत्ता अकरावीचे प्रवेश हे आरक्षणाच्या आराखड्याप्रमाणे काटेकोर पालन करून करण्यात याव्या, यासह विविध विद्यार्थी प्रश्नांवर वंचित बहुजन युवा आघाडी समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयावर दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी भव्य मोर्चा होणार आहे. तरी सर्व विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.