4,6,4,6,6,4… Van Beekने 6 चेंडूत ठोकल्या 30 धावा, पहा व्हिडिओ

WhatsApp Group

एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या पात्रता फेरीत नेदरलँड्सने सुपर ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजचा 22 धावांनी पराभव केला. नेदरलँड्ससाठी लोगान व्हॅन बीकने गोलंदाजी आणि फलंदाजीत धमाकेदार कामगिरी केली. त्याच्यामुळेच नेदरलँडचा संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. व्हॅन बीकच्या स्फोटक फलंदाजीमुळे नेदरलँड्सने वेस्ट इंडिजच्या जबड्यातून विजय हिरावून घेतला.

सुपर ओव्हरमध्ये नेदरलँडचा फलंदाज लोगान व्हॅन बीकने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरविरुद्ध शानदार फलंदाजी केली. त्याने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याने होल्डरविरुद्ध 6 चेंडूत 30 धावा केल्या. या षटकात लोगान व्हॅन बीकने तीन चौकार आणि तीन षटकार मारले.

सुपर ओव्हरमध्ये व्हॅन बीकची दमदार फटकेबाजी

पहिला चेंडू – चौकार
दुसरा चेंडू – षटकार
तिसरा चेंडू – चौकार
चौथा चेंडू – षटकार
पाचवा चेंडू – षटकार
सहावा चेंडू – चौकार

त्यानंतर लक्ष्य वाचवण्यासाठी नेदरलँड्सच्या गोलंदाजीची जबाबदारी लोगान व्हॅन बीकने घेतली. 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली. जेव्हा जॉन्सन चार्ल्सने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. पण त्यानंतर व्हॅन बीकने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर प्रत्येकी एक धाव दिली. त्यानंतर व्हॅन विकच्या चौथ्या चेंडूवर चार्ल्स मोठा फटका मारून बाद झाला. त्याचवेळी रोमारियो शेफर्डही पाचव्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे नेदरलँड संघाने सुपर ओव्हरमध्ये 22 धावांनी सामना जिंकला. सुपर ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजचा संघ केवळ 8 धावा करू शकला.

वेस्ट इंडिजच्या सुपर ओव्हरमध्ये

पहिला चेंडू – षटकार
दुसरा चेंडू – एक धाव
तिसरा चेंडू – एक धाव
चौथा चेंडू – विकेट
पाचवा चेंडू – विकेट

वेस्ट इंडिजविरुद्ध नेदरलँडचा कर्णधार स्कॉट अॅडवार्टने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजकडून ब्रेंडन किंगने 76 धावा, जॉन्सन चार्ल्सने 54 धावा, शाई होपने 47 धावा आणि निकोलस पूरनने 104 धावा केल्या. या फलंदाजांमुळे वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 374 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. नेदरलँड्सकडून विक्रमजीत सिंगने 37 धावांचे, मॅक्स ओ’डॉडने 36 धावांचे आणि कर्णधार स्कॉट एडवर्टने 67 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी तेज निदामारूने 111 धावांची खेळी केली. शेवटी, लोगान व्हॅन विकने 14 चेंडूत 28 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. त्यामुळे दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरी झाली.