Vaibhav Suryavanshi: 14 वर्षाच्या पोरानं मैदान गाजवलं… वैभव सूर्यवंशीने 17 चेंडूत अर्धशतक ठोकून विश्वविक्रम रचला

WhatsApp Group

Vaibhav Suryavanshi: 28 एप्रिल रोजी, 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने स्फोटक फलंदाजी केली आणि जलद अर्धशतक झळकावले. त्याने १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि आयपीएलच्या इतिहासात अर्धशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. तसेच, तो सर्वात कमी वयात टी-२० मध्ये अर्धशतक करणारा जगातील पहिला खेळाडू बनला.

वैभवची विक्रमी खेळी
आयपीएल २०२५ मध्ये, राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने शानदार खेळी केली आहे. त्याने फक्त १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक ठरले.

एवढेच नाही तर वैभवने राजस्थान रॉयल्ससाठी दुसरे सर्वात जलद अर्धशतकही झळकावले आहे. याशिवाय, गुजरात टायटन्सविरुद्धच्या सर्वात जलद अर्धशतकाचा हा विक्रमही बनला आहे.

वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयात अर्धशतक करणारा पहिला खेळाडूही बनला आहे. या धमाकेदार खेळीनंतर वैभवबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये बरीच चर्चा सुरू आहे. भविष्यातही त्याच्याकडून उत्तम कामगिरीची सर्वांना अपेक्षा आहे.